Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार ११ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

अति विचारांच्या आहारी जाऊ नये.  कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. संपर्कातील लोकांच्या वैचारिकतेचा अति विचार करू नका. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. काही प्रमाणात मानसिक तणाव राहील.


वृषभ:-

कला क्षेत्रात संधी मिळू शकेल. बाहेर वावरतांना सावध राहावे. नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. मैत्रीचे संबंध जपावे लागतील.



मिथुन:-

कामाच्या व्यापाने थकून जाल. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. प्रकृतीच्या बाबत चिकित्सक राहाल. मनात विचारांचा गोंधळ माजेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.


कर्क:-

वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. लहान-सहान गोष्टींचा फार ताण घेऊ नका. वैचारिक थकवा जाणवेल. मानसिक स्थैर्य जपावे लागेल. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल.



सिंह:-

कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्यावे. मानसिक चंचलता राहील. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. वात विकारांचा त्रास जाणवेल. ध्यानधारणेत अधिक वेळ घालवा.


कन्या:-

मनातील काही आकांक्षा पूर्ण करून घ्या. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल. कमिशनचा चांगला लाभ मिळेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल.



तूळ:-

चांगला आर्थिक लाभ होईल. वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधाल. तरच काही गोष्टी साध्य करता येतील. प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. 


वृश्चिक:-

सकारात्मक विचाराने वागावे. शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा.  व त्याच दृष्टीने कौटुंबिक प्रश्न हाताळावेत. अति साहस करायला जाऊ नका. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. 



धनू:-

कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत. हाताखालील लोक सहकार्य करतील. घरातील वातावरण तप्त राहील. मानसिक चिंतेने ग्रासले जाऊ शकता.


मकर:-

एकमेकातील समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. तुमची चिकाटी आज उपयोगी पडेल. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. मनातील एखादी जुनी आशा पूर्ण होईल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा.



कुंभ:-

संयमाने वागावे. जोडीदाराच्या मताशी भिन्नता निर्माण होईल. फार तिखट पदार्थ खाणे टाळावे. अनाठायी खर्च होऊ शकतात. आततायीपणे केलेले काम त्रासाला कारणीभूत ठरेल.


मीन:-

क्षुल्लक गोष्टींवर रागराग करू नका. हातातील कलेला वाव द्यावा. करमणुकीच्या गोष्टीत मन रमवा. नातेवाईकांशी संयमाने वागावे. धाडसी निर्णय सारासार विचार करून घ्यावेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies