Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा!आटपाडी:  दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचे महत्त्व नेमके काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 8 जुलै : अभिनेत्री नीतू सिंग यांचा जन्मदिन. 


1972 : माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्मदिन.


1916 : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन मराठी लेखक, इतिहासकार आणि कादंबरीकार गो.नी. दांडेकर यांचा जन्मदिन.


1997 : बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 46 किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.1958 : बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात ’दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.1984 : पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन.1910 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.


1910 साली स्वातंत्रवीर सावरकरांनी ब्रिटीश सरकारच्या कैदेत असतांना त्यांना फ्रांस येथे जहातून नेत असतांना त्यांनी मोरिया नावाच्या जहाजातून फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी मारली.


1954 : साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जगातील सर्वात मोठ्या कालव्यावर भाकरा-नांगल जलविद्युत प्रकल्प सुरु केला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies