Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार २१ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

मानसिक ताण जाणवेल. स्वत:ला नियमांमध्ये बांधून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील. अतिविचार करू नका. आवडते पदार्थ चाखाल.


वृषभ:-

खाण्या पिण्यावर ताबा ठेवा.  मित्रांशी मतभेदाची शक्यता. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा. 



मिथुन:-

जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल.  मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न कराल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील.


कर्क:-

नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. मुलांविषयी चिंता वाटू शकते. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो.



सिंह:-

कौटुंबिक शांतता जपावी. दांपत्य जीवन सुखकारक राहील. झोपेची तक्रार जाणवेल. तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा.



कन्या:-

मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. वरिष्ठांची भेट घेता येईल. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा. टीका सहन करावी लागू शकते. महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत.



तूळ:-

मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल.  भावनिक अस्थिरता जाणवेल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा.



वृश्चिक:-

मुलांचे विचार स्व‍च्छंदी वाटतील. भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदाराचे विचार जाणून घ्याल. कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील.



धनू:-

दुचाकी वाहन सावधपणे चालवावे. चर्चेतून मार्ग काढावा.  नवीन कामाबद्दल सजग रहा. मानसिक चिंता सतावेल. क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका. 



मकर:-

शांततेचा मार्ग स्वीकारावा. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी. प्रेमप्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत.   जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. 



कुंभ:-

भडक प्रतिक्रिया देणे टाळावे. विनाकारण चिंता करत बसू नका. स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका. शिस्तीचा फार बडगा करू नका.



मीन:-

नवीन ओळख फायदेशीर ठरेल.चांगल्या संधीच्या शोधत रहा. मित्रांचे सहकार्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींवर राग राग करू नका. सकारात्मक उर्जेने कामे कराल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies