Type Here to Get Search Results !

“...त्यामुळे मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली”: देवेंद्र फडनविसांचे स्पष्टीकरण !



नागपूर : 'मी सरकारमध्ये राहणार नाही हे ठरले  होते. पक्षाची इच्छा होती की, सरकारच्या बाहेर राहून सरकार चालवू नये. त्यामुळे मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यात मला काही कमीपणा वाटत नाही, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 



फडणवीस म्हणाले, ' आम्ही विश्वासदर्शक ठराव प्रचंड मताने जिंकला आहे. २०१९ मध्ये युतीला बहुमत असताना अनैसर्गिक युती झाली. त्यावेळी मला कुठलाही खेद नव्हता की, मी मुख्यमंत्री होऊ शकलो नाही. पण सरकारने विकासाचे प्रकल्प थांबविल्यामुळे वाईट वाटत होते.



'बाळासाहेबांनी सांगितलेल्या हिंदुत्वापासून फारकत घेतली, याची अस्वस्थता सतत होती. याचा फायदा इतर पक्ष घेत होते. हे बंड नव्हतं हा उठाव होता, आम्ही त्याला सोबत दिली. आम्ही सत्तेकरिता हपापलेले नाही. आम्ही ठरवलं असतं तर आमचा मुख्यमंत्री असता.



मात्र, मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा हा प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाने मान्य केला. मी सरकारमध्ये राहणार नाही हे ठरले होते. पक्षाची इच्छा होती की, सरकारच्या बाहेर राहून सरकार चालवू नये. मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यात मला काही कमीपणा वाटत नाही', असे फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान,  देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा नागपुरात गेले. त्यावेळी त्यांचे समर्थकांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर फडणवीस यांनी महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली.या पत्रकार परिषदेत नागपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र , चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांशी संवाद साधला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies