Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या महत्वाच्या घटना!आटपाडी:  आज 10 जुलै म्हणजेच आषाढी वारीतील महत्वाचा दिवस. आजच्या दिवशी आषाढी एकादशी, बकरी ईद असे महत्वाचे दिवस आहेत. 10 जुलै : देवशयनी आषाढी एकादशी

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी किंवा देवशयनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.10 जुलै : बकरी ईद

इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे. ईद-उल-फितरनंतर मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे बकरी ईद.10 जुलै मातृ सुरक्षा दिन 

जगभरात 10 जुलै हा दिवस मातृ सुरक्षा दिन साजरा केला जातो. माता आणि होणाऱ्या मातांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याची सुरूवात केली. 2005 सालापासून 10 जुलै सर्वत्र मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे मातांचे आरोग्य आणि मातृत्वादरम्यान मातांची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित करण्याचा हा दिन.1978 : मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.


1992 : साली संपूर्ण भारतीय बनावटी चा दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण आणि हवामान सेवांचा बहुउद्देशीय उपग्रह इनसॅट -2 चे प्रक्षेपण फ्रेंच गयानाच्या कुरुझ येथून एरियन -4 द्वारे यशस्वीरित्या करण्यात आले.1856 : साली वाय फाय प्रणालीचे जनक आणि अमेरिकन सर्बियन-अमेरिकन शोधक, इलेक्ट्रिकल अभियंता, मेकॅनिकल अभियंता निकोला टेस्ला यांचा जन्मदिन.


1950 : साली भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण, आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित पंजाबमधील पटियाला घराण्यातील प्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुल्ताना यांचा जन्मदिन.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies