Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार २५ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

प्रेरणा देणार्‍या घटना घडतील. अकारण चिंता करू नका. कार्यालयीन सहकारी मदत करतील. आत्मविश्वासाच्या जोरावर मुसंडी माराल. सकारात्मकतेची जोड घ्याल. 




वृषभ:-

नवीन योजना मनात रुंजी घालतील. पैसे खर्च करताना सारासार विचार करावा. दिवसभर उत्साह जाणवेल. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.



मिथुन:-

सहजीवनात आनंदाचे क्षण येतील. हलक्या कानाच्या लोकांपासून दूर राहावे. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. घरगुती खर्चाचे गणित मांडावे लागेल. जोडीदाराचे नवीन रूप पहायला मिळेल.



कर्क:-

व्यावसायिक स्थिती तणावपूर्ण राहील. कामाचा आवाका समजून घ्यावा. आपले गुपित उघडे करू नका. हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावावा. व्यायामाला कंटाळा करू नका.



सिंह:-

वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी पार पाडाल. घरातील वातावरण चांगले राहील. नातेवाईकांशी जवळीक वाढेल.



कन्या:-

आर्थिक कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. नातेवाईकांना नाराज करू नका. आवडते छंद जोपासाल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल. कामातील रुचि वाढवावी लागेल.



तूळ:-

मानसिक ताण नियंत्रणात ठेवा. विनाकारण वाद उकरून काढू नका. ध्यानधारणा करावी. हिशोबात चोख रहा. वर्तन चांगले ठेवा.



वृश्चिक:-

हातातील काम पूर्ण होईल. आपल्या मनातील कल्पना आमलात आणाव्यात. जवळचा प्रवास घडेल. व्यवसायातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्याल. मुलांचे वागणे स्वतंत्र वाटेल.



धनू:-

कामाची धांदल राहील. मानसिक शांतता जपावी. मेहनतीचे फळ मिळेल. कायदेशीर बाबी पाळाव्या लागतील. प्रयत्नातून यश मिळेल.



मकर:-

इतरांची ढवळा ढवळ सहन करावी लागेल. कामे वेळेत हातावेगळी होतील. कामातून समाधान शोधाल. मनाची द्विधावस्था टाळावी. आरोग्याची वेळेवर काळजी घ्या.



कुंभ:-

प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. नवीन ओळखीचा फायदा होईल. भावंडांसाठी तजवीज कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल.



मीन:-

जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.व्यावसायिक गुंतवणूक जपून करावी. दिवस संमिश्र जाईल. तिखट पदार्थांचा आस्वाद घ्याल. मानसिक ताण कमी करण्यासाठी वाचन करावे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies