Type Here to Get Search Results !

चार चाकी आणि दुचाकीचा अपघात; सहाजण जागीच ठार!



अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शिरजगाव बैंतुल रोडवर मध्यरात्री निभोरा फाटा जवळ चार चाकी आणि दुचाकीच्या अपघातात सहा ठार तर एक जण जखमी झाला आहे.



प्राप्त माहितीनुसार,  या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पांडुरंग रघुनाथ शनवारे, सतीश सुखदेव शनवारे , सुरेश विठ्ठल निर्मळे, रमेश धुर्व, प्रतीक दिनेशराव मांडवकर, अक्षय सुभाष देशकर यांचा समावेश आहे. तसेच या अपघातात संजय गजानन गायन (राहणार बोदड, ता. चांदूर बाजार) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

दरम्यान,  शिरजगाव पोलीस ठाणे येथील रात्रगस्त अंमलदार हे गस्त असताना त्यांना रस्त्यावरील पुलाजवळ मोटरसायकलची शीट पडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी थांबून पाहणी केली असता अपघात झाल्याचे दिसून आले. या अपघातातील जखमी व मृतक हे वाहनात फसलेले होते. त्यांना वाहनातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies