राज्यपालांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठी माणसाच्या अस्मितेशी कुणालाही...”मुंबई : आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारनंतरही कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केले आहे.'गुजराती लोक मुंबईतून गेले,तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. राज्यपालांचे विधान वैयक्तिक आहे. बाळासाहेबांचे योगदान आपल्या सर्वांना माहित आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी कुणालाही अवहेलना करता येणार नाही, मराठी माणसाच्या मेहनतीवर मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली, असे वक्तव्य शिंदे यांनी केले.


तसेच यावेळी ते म्हणाले, मराठी माणसामुळंच मुंबईला वैभव मिळाले आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी कुणालाही अवहेलना करता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवर मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली. मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठीच शिवसेना स्थापन झाली. राज्यपालांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. कुणाचाही अवमान होणार नाही, याची राज्यपालांनी काळजी घेतली पाहिजे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured