Type Here to Get Search Results !

‘या’ कारणामुळे शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट जारी!



मुंबई : मुंबईच्या शिवडी कोर्टाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर संजय राऊत यांना ४ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले.  मात्र, राऊत गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. परंतु,  सदर प्रकरणात संजय राऊत यांना तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला आहे.



मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध कलम 499, 500 आयपीसी अंतर्गत गुन्ह्यासाठी वॉरंट जारी केले. यावेळी मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संजय राऊत यांना सोमवारी कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राऊत कोर्टात हजर राहिले नाही आणि त्यांचे वकील देखील कोर्टात हजर राहिले नाही. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ रोजी ठेवण्यात आली आहे.



दरम्यान, सोमय्याचे वकील गुप्ता आणि लक्ष्मण कनाल यांच्या माध्यमातून तक्रार अर्जात आरोप केले आहे की, राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्या पतीविरोधात अब्रुनुकसान करणारे आरोप केले. तसेच मेधा यांच्यावर मीरा-भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळ्यात सामील झाल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने संजय राऊतांना तत्काळ जामीन मंजूर केला आहे.(सौ. साम)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies