सांगलीच्या संकेत सरगरला राज्य सरकारकडून ‘इतक्या’ रुपयांची घोषणा!



मुंबई: इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारतासाठी पहिले पदक जिंकले. सांगली जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील संकेत सरगरने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.


अशातच आता महाराष्ट्र सरकारने संकेताला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून संकेत सरगरला ३० लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच संकेतचे प्रशिक्षक यांना देखील ७.५० लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे शिंदेंनी सांगितले आहे. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured