Type Here to Get Search Results !

“नागरिकांना मदत कशी करता येईल ते बघा अन उध्दव ठाकरेंसारखं काम करा”: ‘यांचा’ राज्य सरकारला सल्ला!



यवतमाळ : पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी  केले त्याप्रमाणे काम करण्याचा सल्ला देखील त्यांनी राज्य सरकारला दिला.



या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, 'दोन मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. तुम्ही तुमचे काम करा, चांगल काम केलं तर कौतुक करू शेतकऱ्यासाठी केंद्राचा निधी आणा राज्याला द्या तो तुमचं आधिकार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.



तसेच, स्टेटमेंट देण्यापेक्षा नागरिकांना मदत कशी करता येईल ते बघा. उध्दव ठाकरेंसारखं काम करा, मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने नागरिकांनी मदत कोणाकडे मागावी? सर्व्हे, न करता थेट मदत द्या. अधिवेशन घ्यायला तयार नाही, मंत्रिमंडळ विस्तार करायला तयार नाही. अजुनही नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झाले नाहीत.



विरोधाला विरोध म्हणून करणार नाही, आम्ही सत्तेत असताना विरोधी पक्षाने एखादी गोष्ट लक्षात आणून दिली की आम्ही त्वरित निर्णय घ्यायचो. राज्यातील नागरिक अडचणीत असताना ही वेळ चर्चा करण्याची नाही, असे वक्तव्य करत अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीका केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies