Type Here to Get Search Results !

तासगाव: युवकाचा धारदार शस्त्राने खून; तिघेजण अटकेत!



तासगाव : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजूरीत साहेबराव शिंदे गणेश (वय ३७) या युवकाचा किरकोळ कारणाने कुर्‍हाड व चाकूच्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  मणेराजुरी येथील एका चौकात साहेबराव शिंदे गणेश आणि लखन कांबळे या दोघांत शुक्रवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. दोघांनीही एकमेकांना बघून घेतो असा दम भरला होता. याच कारणावरून शनिवारी मणेराजुरी गव्हाण रस्त्यावर समाज मंदिराजवळ रात्री साडेआठच्या सुमारास रोहन उर्फ रुपेश अनिल माने तसेच गुंड्या उर्फ दादासाहेब कांबळे, बापूसाहेब उर्फ बाजीराव चव्हाण आणि लखन कांबळे या चौघांनी साहेबराव शिंदे गणेश याच्याशी मारामारी केली. त्यानंतर त्यांनी कुऱ्हाड चाकू, कोयता या शस्त्राने त्याच्या वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.


दरम्यान,  या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील एकाचा शाेध सुरु असल्याची माहिती तासगाव पोलिसांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies