Type Here to Get Search Results !

चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवासी बस थेट दरीत कोसळली अन...!



शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे प्रवाशांनी भरलेली बस अचानक दरीत कोसळली. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरू केले आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस प्रवाशांना घेऊन नागरोटा (कांगडा) येथून शिमल्याकडे येत होती. बसमध्ये 20 ते 23 जण प्रवासी होते. बस हिरा नगर परिसरात एका घाटात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट 100 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत बसमधील एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले.



दरम्यान,  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies