Type Here to Get Search Results !

अंगणात थुंकल्याच्या कारणावरून लहान भावानेच केली मोठ्या भावाची हत्या!



नांदेड:  नांदेडमध्ये अंगणात थुंकल्याच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली आहे. या घटनेने नांदेडमध्ये  खळबळ उडाली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  लहान भाऊ असलेला सतीश तुपसमूद्रे आणि मोठा भाऊ एकनाथ तुपसमूद्रे यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात सतीशने घरातून भाजी चिरण्याचा चाकू घेऊन एकनाथच्या छातीत रागाच्या भरात वार केले. एकनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सतीशने घटनास्थळावरुन पलायन केले.



दरम्यान, याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात सतीश तुपसमूद्रे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies