Type Here to Get Search Results !

सांगली: चोरट्यांनी भरदिवसा दोन पोलिसांचे फ्लॅट फोडले!



सांगली : सांगलीतील कुपवाड रोडवरील माळी मंगल कार्यालय परिसरात असलेल्या अपार्टमेंटमधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे भरदिवसा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व तीन हजार रुपये रोकड लंपास केली. 


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  कुपवाड रोडपासून जवळच असलेल्या माळी मंगल कार्यालय परिसरात कृष्णकुंज अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संदीप मोरे व सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी पूजा खाडे राहण्यास आहेत. बुधवारी मोरे यांचे कुटुंबीय परगावी गेल्याने ते फ्लॅटला कुलूप लावून ड्युटीवर गेले होते, तर खाडे या एकट्याच राहत असल्याने त्याही कुलूप लावून गेल्या होत्या. सकाळी अकरा ते दुपारी दीड या कालावधीत कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दोन्ही फ्लॅट फोडले. यात मोरे यांच्या फ्लॅटमधून सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले, तर खाडे यांच्या फ्लॅटमधून दोन तोळ्यांचे दागिने लंपास करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies