Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २२ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

वेळेचा अपव्यय करू नका. धार्मिक कामात मन गुंतवाल.  अभियांत्रिकी क्षेत्रामधील व्यक्तींना लाभ होईल. परिस्थितीत सुधारणा होईल. आज काहीतरी वेगळे शिकायला मिळेल.




वृषभ:-

नवीन संधीकडे लक्ष ठेवावे.  ताण व त्रस्तता घालवावी. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. कामाचे योग्य नियोजन व नियंत्रण हवे. दूरदृष्टीतून सकारात्मकता साधावी. 



मिथुन:-

वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. एकतर्फी वाद वाढवू नका. योग्य कृतीतून ताण हलका होईल. सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल.



कर्क:-

खाद्यपदार्थात रमून जाल. करियर संबंधी निर्णय सारासार विचारातून घ्यावेत. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी. पोटाचे विकार सतावतील.  मनातील निराशा दाटून येऊ शकते.



सिंह:-

उत्तम व्यावसायिक लाभ होईल. प्रयोगशील राहावे लागेल. नोकरदारांची समस्या मिटेल. चांगल्या संगतीचा लाभ घ्यावा. आपल्या ज्ञानात भर पडेल.



कन्या:-

उगाचच चिडचिड करू नका. आराम हराम आहे, हे ध्यानात घ्यावे. हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. नियोजनात फारसा बदल करू नका. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.



तूळ:-

काही कामे त्वरेने आवरती घ्याल. कामात ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या स्वरुपात बदल करण्याचा विचार कराल. सरकारी कामे पुढे सरकतील. मन प्रसन्न राहील.



वृश्चिक:-

कमी वेळेत कामे पार पडतील. जुन्या निर्णयावर पुनर्विचार करावा. तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल. महत्त्वाचे कागद जपून ठेवावेत. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.



धनू:-

घरगुती कामावर भर द्याल. कामात काहीसा उत्साह जाणवेल. जोडीदाराशी चांगली चर्चा होईल. एकमेकातील एकोपा वाढेल. निर्णय चांगले संकेत देतील.



मकर:-

व्यावसायिक गणित जुळेल. धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे. हातात काही नवीन कामे पडतील. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. मनाची चंचलता दूर सारावी.



कुंभ:-

जवळचे मित्र समजून घेतील. अन्यथा नुकसान संभवते. हतबल होण्याची आवश्यकता नाही. बोलताना भान राखावे. चांगली संगत ठेवावी.



मीन:-

अनोळखी व्यक्तींचा त्रास करून घेऊ नका.आर्थिक बाजू सुधारेल. योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे. व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील. समाधानकारक घटना घडतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies