Type Here to Get Search Results !

तासगाव: शेतकऱ्याकडून द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध; भारत सरकारकडून मिळाले पेटंट!


तासगाव:  तासगाव तालुक्यातील वडगावच्या विजय देसाई या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने साडे सहा सेमी मण्याची लांबी असलेल्या द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला आहे. आता द्राक्षाच्या या नव्या जातीला भारत सरकारकडून VSD Seedless चे पेटंट मिळाले आहे. १४ जुलै २०२० रोजी विजय देसाई यांनी पेटंटसाठी अर्ज दाखल केला होता. 



तासगाव तालुक्यातील वडगाव येथील विजय शंकर देसाई या द्राक्षबागातदार शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला आहे. जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांमध्ये या द्राक्षाची बरीच चर्चा झाली. आता मात्र या द्राक्षाच्या जातीला VSD Seedless या नावाने पेटंट मिळाले आहे.



विजय देसाई यांची मूळची चार एकर जमीन. माळरानावरल्या जमिनीत सुपर जातीची द्राक्षबाग होती. आठ वर्षांपूर्वी त्याच बागेत एका झाडावर त्यांना वेगळ्या पद्धतीचा द्राक्षघड दिसला. त्यांनी त्या झाडाच्या काड्या काढून काही नवीन लागण केलेल्या बॅग्स भरल्या. त्याचा माल बांगलादेश आणि मुंबईच्या मार्केटला पाठवला. या द्राक्षच्या मालास व्यापाऱ्यांनी सगळ्यांपेक्षा जास्तीचा दर दिला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना आता चांगलाच फायदा होणार आहे.



जास्त रोगप्रतिकारक क्षमता, जास्त गोडी, कमी खर्चात जास्त उत्पादन, मोठी पाने आणि मण्यांची विक्रमी साडे सहा सेमी लांबी ही या द्राक्षाच्या जातीची वैशिट्ये आहेत. एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानेच स्वत:च्या अनुभवातून शोधून काढलेल्या या द्राक्षाच्या नवीन वाणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आणखी एक द्राक्षाचे वाण लागवड करण्यास मिळणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies