मुंबई : शिवसेनेचे काही खासदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढलेली दिसत आहे.
गृहमंत्री अमित शाह हे कृष्णा मेनन या निवासस्थानाच्या मागील प्रवेशद्वारातून शिवसेनेच्या एकूण ११ खासदार गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या खासदारांबरोबर गृहमंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्याकडे ११ खासदारांना घेऊन जाणारा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खास समजला जातो. त्यामुळे सदर शिवसेनेचा तरुण आणि उच्चशिक्षित खासदार कोण प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदार काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.