Type Here to Get Search Results !

दगड डोक्यावर ठेवला काय आणि छातीवर ठेवला...; शरद पवार!



मुंबई: मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, असे भाष्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले. या वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया  देताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर दगड डोक्यावर ठेवला काय आणि छातीवर ठेवला काय हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.अशी जोरदार प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies