Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार २७ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

महिला वर्ग खुश राहील.  विद्यार्थ्यांना चांगला काल. जोडीदाराची कृती खटकू शकते. जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते. 



वृषभ: 

मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. योग्य तर्क करावा लागेल. योग्य मूल्यमापन करावे. अति अपेक्षा ठेऊ नका. गुंतवणूक लाभदायक ठरेल.



मिथुन:

मानसिक समाधान लाभेल. आर्थिक बाजू बळकट करावी. एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात. स्वत:ला बंधनात अडकवू नका. दिवसाची सुरुवात आनंदात होईल.



कर्क:

दिवस आळसात जाईल. हट्टीपणा सोडावा लागेल.  देणी-घेणी मिटतील. अति विचार करण्यात वेळ वाया घालवाल. घराबाहेर वावरतांना योग्य काळजी घ्यावी. 



सिंह :

कामावर अधिक लक्ष  केंद्रित करावे. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे.  छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. 



कन्या:

मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल. शेजारधर्म पळवा लागेल. वादाचा मुद्दा जिंकाल. कशाचाही गैरफायदा घेऊ नका. तडकाफडकी निर्णय घेऊ नका.



तूळ:

प्रबळ इच्छेवर कामे होतील. नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. औद्योगिक व्यवहारात चोख रहा. उधार-उसनवार नको. प्रेरणा प्रामाणिक हवी.



वृश्चिक:

कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या.  कायदेशीर सल्ला घ्यावा. मुलांचा विचार समजून घ्या. प्रलंबित येणी मिळू शकतील. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा.



धनू:

परिस्थितीत सुधारणा होईल.  मोठे व्यवहार करताना सावधान. मन विचलित होऊ देऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा. अफवांवर विश्वास ठेऊ नका.



मकर:

बौद्धिक क्षमता वाढीस लावा. जवळचा प्रवास पुढे ढकलावा. अचूक माहिती मिळवावी. प्रलंबित गाठी घेता येतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.



कुंभ:

जुने वाद उकरून काढू नका. पूर्व नियोजित कामे करावीत. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका. मैत्रीत वादाची शक्यता. मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका.



मीन: 

घराचे व्यवहार मार्गी लावावेत. आततायीपणे कृती करू नका. बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात. मनाची चंचलता वाढेल. फार कडक धोरण घेऊ नका.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies