Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार २६ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष

आनंदाचा गुणाकार होईल. वैवाहिक जीवन उत्तम राहील.  घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल. व्यापारातील फायदा भरून काढावा. 



वृषभ:-

जमिनीच्या कामात यश येईल. दिवस हास्य-विनोदात जाईल.  नवीन कामात हात घालावा. मैत्रीचे संबंध जपावेत. मानसिक समाधान लाभेल. 



मिथुन:-

जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वेळेचा अपव्यय टाळावा. मुलांसाठी खरेदी कराल. कौटुंबिक समस्या सोडवाल.



कर्क:-

मानसिक अस्थिरता जाणवेल. आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मत अधिक स्पष्टपणे मांडाल. काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न कराल. नवीन ओळखीतून कामे होतील.



सिंह:-

मन प्रसन्न राहील.  मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामात काही बदल करावे लागतील.



कन्या:-

कौटुंबिक ताण हलका करावा. गोड बोलून कामे करून घ्यावीत. आदर, आपुलकी कायम ठेवावी. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील.



तूळ:-

घरातील कामात व्यस्त राहाल. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत. व्यावसायिक विरोधकांना कृतीतून उत्तर द्याल. शांत राहून विचार करावा.



वृश्चिक:-

जि‍भेवर ताबा ठेवावा, अन्यथा मन खिन्न होऊ शकते. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. करियर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.



धनू:-

मुलांची बाजू समजून घ्यावी. खेळकर वृत्तीने वागावे. कामात बढतीचा योग आहे. मानसिक संतुलन राखावे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा.



मकर:-

महत्त्वाचे व्यवहार करताना सावध रहा. धार्मिकतेकडे ओढ वाढेल.  आर्थिक बाबीत जागरूक राहावे. नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात. प्रवास सावधानतेने करावेत. 



कुंभ:-

अधिकार्‍यांच्या सल्ल्यानेच वागावे. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल. प्रवास पुढे ढकलावा. कुटुंबात मन रमेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.



मीन:-

जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल. दिवस धावपळीत जाईल. सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल. मानसिक ताण कमी होईल. विश्वासाने कार्य करत राहावे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies