Type Here to Get Search Results !

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश!



मुंबई : सतत फोनचा वापर केल्याने डोळ्यांची आग होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होण्याच्या समस्या जास्त वाढतात. त्यामुळे आपण डोळ्यांची सतत काळजी घ्यायला हवी. जर आपल्याला चश्मा असेल तर त्याचा वापर आपण करायला हवा. तसेच आपण दिवसभर लॅपटॉपवर काम करत असू तर आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलायला हव्या. 


यासाठी आपल्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारात खालील पदार्थांचा समावेश करा:

आपल्याला आहारात अंडीचा समावेश केल्यास त्याचा देखील फायदा होतो. अंड्यातील पिवळ्या बलकांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे आपल्याला डोळ्यांना त्याचा फायदा होतो. पुरेशा प्रमाणात डोळ्यांना प्रथिने मिळाल्यास डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते.


तसेच, बदाम खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. बदामामध्ये जीवनसत्त्व ई आढळून येते. ज्याचा वापर डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी केले जाऊ शकते.


याशिवाय, टोमॅटोत ल्युटीन, लाइकोपीन नावाचे घटक असल्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्यास दूरदृष्टी वाढवण्यास त्याचा फायदा होतो. यात अँटिऑक्सिडंट्स पुरेसे प्रमाणात असल्यामुळे डोळे निरोगी राहतात.

त्याचप्रमाणे,  लहान मुले व किशोरवयीन, तरुण आणि प्रौढांना पालेभाज्या खाणे आवडत नाही, परंतु, ते डोळ्यांसाठी खूप आरोग्यदायी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. डोळ्यांसह शरीरातील अनेक अवयवांना त्यांचा फायदा होतो. हिरव्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो. तसेच मॅक्युलर डिजेनेरेशन देखील कमी करता येतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies