Type Here to Get Search Results !

काळजी घ्या! गेल्या २४ तासांत देशात ‘इतके’ नवे रुग्ण; ४३ जणांचा मृत्यू!



नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्या सतत वाढत असून गेल्या २४ तासांत भारतात १८,८४० रुग्ण आढळले आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतची ही नवीन कोरोना व्हायरसची आकडेवारी नोंदवली गेली आहे. तसेच गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसमुळे ४३ हून अधिक मृत्यू झाले आहेत.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती अशी कि आज देशात १८,८४० रुग्ण आढळले आहेत. तर अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १,२५,०२८ आहे, तसेच पॉझिटिव्हीटी रेट ४.१४% इतका आहे. तसेच,  दिल्लीत गेल्या २४ तासांत ५३१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि ३ मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीत एकुण रुग्णसंख्या १९,३९,७५८ वर गेली आहे.



दरम्यान, मुंबईत ५३० नवीन कोविड-१९ ची नोंद झाली आहे तर पॉझिटिव्ह रेट ५.२५% आहे आणि गेल्या २४ तासांत २ मृत्यू झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या ११,१७,८९७ वर पोहोचली, तर मृतांची संख्या १९,६२४ वर पोहोचली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies