Type Here to Get Search Results !

शिक्षकाने विद्यार्थ्यास केली लाथा मारत बेदम मारहाण! शिक्षक अटकेत !



पाटणा: पाटणा येथील एका शिक्षकाने ६ वर्षांच्या निष्पाप विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.



व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका कोचिंग सेंटरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षक एका ६ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे आणि जेव्हा काठीचे दोन तुकडे झाले तेव्हा शिक्षकाने मुलाला लाथा मारण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये मुलगा रडताना आणि मारू नका अशी विनंती करताना दिसत आहे. शिक्षकाची बेदम मारहाण मुलाला सहन न झाल्याने अखेर तो बेशुद्ध पडला. तर आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते पण या शिक्षकाला कोणीही विरोध केला नाही.परंतु या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 



तसेच,  व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या कोचिंक क्लास शिक्षकाला हुडकून काढत त्याला अटक केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन यांच्या सूचनेनंतर, पोलिसांनी एफआयआर नोंदवून ही कारवाई केली आहे.दरम्यान, आरोपी अमरकांत याला पोलिसांनी अटक केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies