Type Here to Get Search Results !

मिरची व्यापाऱ्याकडून चोरट्यांनी पैशांची बॅग केली लंपासनागपूर : नागपूरात मिरची व्यापाऱ्याकडून ट्रान्सपोर्ट मालकाला देण्यासाठी वीस लाख रुपये बॅगमध्ये घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्याकडून तिघांनी भरदुपारी बॅग पळवून नेल्याची घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत चिखली उड्डाणपुल परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ रामटेके हे मोहन साजवानी नावाच्या जरिपटका भागात राहणाच्या मिरची व्यावसायिकाकडे काम करतात. त्याचे लकडगंज येथे कार्यालय आहे. बुधवारी रोहीत ट्रेडर्सच्या मालकाकडून २० लाख रुपये घेऊन सिद्धार्थ लकडगंज येथे असलेल्या मालकाच्या कार्यालयाकडे जाण्यास कळमना येथून आपल्या दूचाकीने लकडगंजच्या दिशेने निघाले.

दरम्यान, ते चिखली उड्डाणपुलावर येताच, मागून तीन युवक त्यांच्या बरोबरीने आले. त्यांनी त्याला अडवून धक्काबुक्की करीत, बॅग हिसकावून पसार झाले. यावेळी सिद्धार्थने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. दरम्यान याबाबत त्याने मालक मोहन यांना सांगितले. त्यांनी यशोधरानगर पोलिस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. त्या आधारावर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies