कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज, रविवारी निधन झाले. सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी ९१ वर्षी अखेरचा श्वास घेतला.याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगा , सून , २ मुली असा परिवार आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. पाटील यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पाटील यांच्या मातोश्रीच्या पार्थिवावर आज दिनांक (२४ जुलै) रोजी रात्री ८.३० वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.