Type Here to Get Search Results !

तासगाव : अपहरण झालेले एक दिवसाचे बाळ सापडले सुखरूप; पोलिसांची यशस्वी कामगिरी!



तासगाव:तासगावातील डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून अपहरण झालेले एक दिवसाचे बाळ भवानीनगर येथे मिळून आले असून बाळ सुखरूप आहे. तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची यशस्वी कामगिरीमुळे हे बाल सुखरूप मिळाले आहे. बोगस नर्स म्हणून कामावर येऊन एका महिलेने येथील रुग्णालयातून एक दिवसाच्या चिमुरड्याचे अपहरण केले. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, येथील सिद्धेश्वर चौकातील सरस्वती आनंद रुग्णालयात एक महिला प्रसूत झाली. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचे भासवून संबंधितांच्या वाॅर्डमध्ये गेली. तेथून एक दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या काखेतील बॅगमध्ये टाकले. या बालकाला घेऊन महिलेने क्षणार्धात पलायन केले. या घटनेने हॉस्पिटलसह शहरात खळबळ उडाली होती. 


दरम्यान,  हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी पावणेनऊ वाजेच्या दरम्यान घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies