Type Here to Get Search Results !

सख्ख्या भावांनी नशीला पदार्थ देऊन महिलेवर केला लैंगिक बलात्कार!



उत्तर प्रदेश:  उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  



पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला सतत ब्लॅकमेल केले जात होते. हि घटना  २४ एप्रिल रोजी घडली दोन तरुणांनी गावातील एका खोलीत तिला पाण्यात नशीला पदार्थ दिला, त्यानंतर तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला. तसेच अश्लील व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 



दरम्यान, वैतागलेल्या महिलेने तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies