Type Here to Get Search Results !

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; शिवसेनेतील खासदार शिंदे गटात होणार सामील?



मुंबई: शिवसेनेतील आमदारांचे बंड आता खासदारपर्यंत पोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या काही खासदारांची काल दिल्लीत बैठक झाल्याचे समोर येत आहे. कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांना वगळून ही बैठक झाली आहे.


तसेच शिवसेनेचे तब्बल ११ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने केला आहे, त्यामुळे दिल्लीतील आजच्या बैठकीने राजकीय चर्चाना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे.


शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक काही दिवसांनी होणार आहे. याअगोरच शिवसेनेतील खासदार शिंदे गटात सामील होतील अशी माहिती समोर  येत आहे. या बैठकीला भाजपचे एक मोठे नेते उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.



पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक झाली झाली. या बैठकीत अनेक खासदारांनी भाजपशी जुळवून घेण्याचे तसेच, शिवसेना-भाजप युतीचा विचार करावी, अशी विनंती केली. त्यामुळे आता शिवसेनेचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies