Type Here to Get Search Results !

३३ वर्षीय युवकावर लैंगिक अत्याचार!



मुंबई: मुंबईतील मुलुंडमध्ये  एका ३३ वर्षीय युवकावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याच्या गुप्तांगावर चक्क मेणबत्तीचे चटके देण्यात आले आहेत. पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलीसांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी याबद्दल दिलेली माहिती अशी कि, अनैसर्गिक अत्याचार करणारा ३४ वर्षीय आरोपी सुरेश म्हस्के या नराधमाविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुरेश म्हस्के याने ३३ वर्षीय तक्रारदार असलेल्या तरुणाकडून काही पैसे उधार घेतले होते. हे पैसे परत देण्यास आरोपी टाळाटाळ करत होता, त्यामुळ तक्रारदार तरुणाने त्याच्याकडे अनेकदा पैशांचा तगादा लावून धरला होता. 


असेच एक दिवस ६ जुलैला त्या तरुणाने आरोपीकडे पुन्हा पैशांची मागणी केली, त्यामुळे आरोपीला प्रचंड राग आला आणि हा राग अनावर झाला. आरोपीने दुपारी २ वाजता तरुणाला मुलुंड कॉलोनीत असलेल्या हिंदुस्तान चौकासमोरच्या गोडाऊनमध्ये गाठले आणि त्याला मारहाण करत तरुणावर लैंगिक अत्याचार केले आहे. यावेळी आरोपीने तरुणाच्या गुप्तांगात पाईप घातला. तसेच, त्याने तरुणाच्या गुप्तांगाला मेणबत्तीचे चटकेही दिले. या अनैसर्गिक अत्याचारामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सायनमधील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


दरम्यान,  तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी म्हस्केवर ३७७, ३२६, ५०४,५०६ भादवी कलमांतर्गत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies