Type Here to Get Search Results !

साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा बाल्कनीतून खाली तोल गेल्याने जागीच मृत्यू!



वसई: इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईलगत्या वसईमधील असून जेव्हा हा अपघात झाला तेव्हा ही चिमुकली घरी एकटीच होती. घराच्या बाल्कनीतून या चिमुकलीचा तोल जाऊन तिचा जागीच मृत्यू झाला.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, श्रेया महाजन असे मृत चिमुकलीचे नाव आहे. काल, शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रेयाची आई तिच्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेली असताना श्रेया घरात एकटीच होती. मोबाईलवर खेळता खेळता ती बाल्कनीमध्ये आली होती. बाल्कनीमध्ये आली असताना यावेळी तिच्या हातातील मोबाईल खाली पडला. तो मोबाईल परत मिळवण्यासाठी ती मोबाईलच्या नादात ग्रीलवर चढली.


दरम्यान, या चिमुकलीचा तोल गेल्याने ती बाल्कनीतून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies