Type Here to Get Search Results !

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे निधन!



न्यूयॉर्क - अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे. इव्हाना ट्रम्प यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. खुद्द माजी राष्ट्रपतींनी याबाबत माहिती दिली आहे. 



ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इव्हाना यांना श्रद्धांजली वाहिली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, 'तुम्हा सर्वांना कळवताना मला अतिशय दु:ख होत आहे की, माझी पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झाले आहे. ती तुमच्यापैकी अनेकांच्या प्रेरणास्थानी होती. ती एक सुंदर महिला होतीच पण तितकीच प्रेरणादायी देखील होती. इव्हाना अनेकांसाठी प्रेरणा ठरली. इव्हाना ट्रम्प यांचा त्यांची तीन मुलं डोनाल्ड ज्युनियर, इवांका आणि एरिक यांना खूप अभिमान आहे. इव्हाना ट्रम्प या एक मॉडेल होत्या, ज्यांनी 1977 मध्ये डोनाल्ड ट्रम्पशी लग्न केलं होतं. इव्हाना यांच्या निधनामुळे ट्रम्प कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना ट्रम्प यांनी 90 च्या दशकाच्या सुरुवातीला घटस्फोट घेतला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 1993 मध्ये अभिनेत्री मार्ला मॅपल्सशी दुसरे लग्न केले. पण मॅपल्सशी ट्रम्प यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि 1999 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी तिसरे लग्न मेलानिया ट्रम्प यांच्याशी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies