Type Here to Get Search Results !

प्रेयसीनेच घरातल्याच्या मदतीने प्रियकराची केली हत्या!



मुंबई: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून दारूच्या नशेत त्रास वाढल्याने, प्रेयसीने तिच्या १३ वर्षीय मुलगा, मुलगी, जावई, भाऊ यांच्या सहाय्याने बॅटने मारहाण करत त्याची  हत्या केली. या प्रकरणी  पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, भांडुपच्या राधा कृष्णा चाळ परिसरात एक जण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती भांडुप पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्याला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले आहे. चौकशीत मृत व्यक्तीचे नाव विनोद विलास साटम  (३८) असून, तो भांडुपच्या गुरखा चाळीत राहण्यास असल्याचे समोर आले. 



दरम्यान,  साटम हा आरोपी बिशनुसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. तो तिला, तसेच तिच्या मुलास दारूच्या नशेत शारीरिक व मानसिक त्रास, मारहाण, शिवीगाळ करत असल्याने, त्रासाला, छळाला कंटाळून तिने त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.


तसेच, तपासाच्या आधारे पोलिसांनी बिशनु तेकबहादूर भंडारी (४२) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. हा गुन्हा अल्पवयीन मुलगा, भाऊ  राजेंद्र तेकबहादूर भंडारी (६०), मुलगी  लक्ष्मी योगेश कदम (२८), जावई योगेश राजू कदम (२५) आणि रिक्षा चालक सतीश प्रेमकुमार प्रयाल (४६) यांनी मिळून  साटमला ठार मारल्याचे सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies