Type Here to Get Search Results !

"....तेव्हा बंड केलं हे उद्धव ठाकरे खोटं सांगत आहेत” : ‘या’ बंडखोर आमदारांने फेटाळले आरोप!



मुंबई - सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या  विषयांवर भाष्य केले आहे. तसेच "मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या" असा आरोपही त्यांनी केल्याने या पार्श्वभूमीवर  आता शिंदेगटाच्या आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे.



"सत्तेत जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता. त्यांच्याकडे नगरविकाससारखं महत्त्वाचं खातं आहे. मी आजारी असताना घडलेला हा प्रकार केल्याचं उद्धव ठाकरे सांगत आहेत. हे खोटं आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी अभिषेक केला. ही दोन वर्षांपासूनची प्रक्रिया आहे. ते बरे झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको आहेत, असे आम्ही म्हटले. पण आजही मुलाखतीतून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मोठं म्हटलंय, याचं वाईट वाटतं" असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले.



तसेच पुढे शिरसाट म्हणाले, “शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेही होऊ शकत नाही. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाजवळ राहू. शिवसेनाप्रमुखांची बरोबरी करण्याची आमची लायकी नाही. एकवेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरता येणार नाही असा घणाघात आमदार संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies