Type Here to Get Search Results !

‘या’ देशात स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये गोळीबार; हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू!



वाशिंग्टन: ४ जुलै अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी शिकागोमध्ये स्वातंत्र्य दिन परेड दरम्यान गोळीबार झाला. शिकागोच्या उपनगरातील इलिनॉय राज्यातील हायलँड पार्कमध्ये ही घटनाघडल्याचे समोर आले. या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला. तर ५७ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



तसेच,  परेड सकाळी १० वाजता सुरू झाले. पण परेड गोळीबारानंतर थांबवण्यात आले. पेरड पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितले आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,  हल्लेखोराने छतावरून परेडमधील सहभागींवर गोळीबार केला. रायफल जप्त करण्यात आली आहे. मात्र, त्याने कोणत्या इमारतीच्या छतावरून गोळीबार केला याचा अजुनही शोध घेतला जात आहे. पोलिसांनी संशयित हल्लेखोराचा फोटो जारी केला आहे. रॉबर्ट ई क्रेमो उर्फ बॉबी असे संशयिताचे नाव आहे. हल्लेखोर १८ ते २० वयोगटातील तरुण आहे,.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies