लग्नाच्या २० व्या दिवशी सून गेली माहेरी अन पतीसह सासूही तुरुंगात!नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील लग्न झाल्यावर नवीन सून सासरी आली आणि अवघ्या 20 दिवस पतीसोबत राहून पंजाबला परतली. कारण मैत्री, प्रेम आणि लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये रोज भांडण वाद सुरू झाले. 20 दिवसांत माहेरच्या घरी जाणारी सून वर्षभरापासून पंजाबमध्ये आहे. आता पंजाबमध्ये हुंडा कायद्याबाबत सुनेने पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पंजाब पोलिसांनी ग्वाल्हेरमध्ये कारवाई करत सुनेच्या तक्रारीवरून सासूला अटक केली आहे. तर तिच्या पतीला आधीच अटक करण्यात आली आहे.याबद्दल अधिक माहिती अशी कि, गौरव सिंह नावाचा तरुण व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. तो ग्वाल्हेरच्या पडव पोलीस स्टेशन हद्दीतील कांती नगरमध्ये राहतो. गौरवची दिल्लीत पूनम नावाच्या मुलीशी एक वर्षापूर्वी भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीनंतर दोघांनी 16 व्या दिवशी लग्न केले. ही तरुणी ग्वाल्हेरमध्ये गौरव सिंहसोबत राहू लागली. त्याचे कुटुंबही गौरवसोबत राहते. मात्र, लग्नाच्या 20 दिवसातच पूनम पंजाबमध्ये तिच्या माहेरी गेली. गौरवने अनेक वेळा तिला घरी येण्याबाबत विनंती केली मात्र, गौरवने समजावल्यानंतरही तिने येण्यास नकार दिला. तसेच, गौरव दुसऱ्या एका प्रकरणात तुरुंगात आहे. त्याचवेळी, पूनमने पती गौरव आणि सासूविरुद्ध हुंडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.


 

दरम्यान, याप्रकरणी पंजाब पोलिसांनी गौरवच्या आईला अटक करून पंजाबला नेले आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured