चक्क! ३० वर्षीय महिला १५ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत गेली पळून अन...!विजयवाडा: आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा शहरात एका ३० वर्षीय महिलेवर १५ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. ही महिला मुलासोबत राहून शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने पळून गेली होती. पोलिसांनी हैदराबादमधील  एका घरातून त्या मुलाला आणि महिलेला ताब्यात घेतले. याबद्दल अधिक माहिती अशी कि, १९ जुलै रोजी आठवीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलाने त्याच्या पालकांना मित्रांना भेटायला जात असल्याचे सांगून गेला होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. मुलगा घरी न आल्यानंतर त्याच्या पालकांनी तक्रार दिली.तो अल्पवयीन मुलगा  घरी परतला नाही म्हणून कुटुंबीयांनी आजूबाजूच्या लोकांजवळ चौकशी केली. यानंतर त्यांच्या शेजारी राहणारी एक महिला देखील बेपत्ता असल्याचे समजले. महिलेनेच मुलाचे अपहरण केल्याचा संशय मुलाच्या कुटुंबीयांना आल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. यानंतर महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर मंगळवारी पोलिसांना माहिती मिळाली की, ही महिला एका अल्पवयीन मुलासोबत हैदराबाद येथील एका खोलीत भाड्याने राहत आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतले. ही महिला त्या मुलाकडे आकर्षित झाली होती, आणि अपहरण करण्यापूर्वीच ती तिच्या घरी त्या मुलाशी शारीरिक संबंध ठेवत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.(सौ.साम)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured