कोरोनाची चौथी लाट: देशात ‘इतकी’ कोरोना रुग्णसंख्या!नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 20,528 नवीन रुग्ण आढळले आहेत.तर या काळात 49 जणांचा मृत्युही झाला. देशातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या आता 1,43,449 वर पोहोचली आहे. शनिवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 2,382 नवीन रुग्ण आढळून आले होते. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 80,17,205 वर पोहोचली. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 1,48,023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रात 2,853 रुग्णांनी कोरोनावर मात केली.सध्या महाराष्ट्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15,521 आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured