Type Here to Get Search Results !

सांगली : प्रेम भंग झाल्यानंतर स्वत:च्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवला अन तरुणाने केली आत्महत्या!



सांगली - आधी प्रेम विराहाचा व्हिडीओ नंतर स्वतःच्या श्रद्धांजलीचा फोटो मोबाइलला स्टेटस ठेवून सांगलीतील वाळवा येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुशांत तोडके असे मृत तरुणाचे नाव असून वाळवा येथे एका शेतामध्ये असणाऱ्या गोठ्यात त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  खेड रस्त्यावर असणाऱ्या एका शेतात सुशांत भरत तोडके वय २६ राहणार पलूस तालुक्यातील नागठाणे हा शेतमजूर म्हणून काम करत होता. काल सुशांतने काम करत असलेल्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 



दरम्यान, आत्महत्येपूर्वी सुशांत याने आपल्या मोबाईलवर व्हॉटसअॅप स्टेटसला प्रेम भंगचा व्हिडीओ रील ठेवला. जो कोणाला तरी उद्देशून होता. त्याच्या अर्ध्या तासानंतर त्याने स्वतःचा फोटो आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा मजुकर असणारा स्टेटस ठेवत काही वेळाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies