पिकअप व्हॅन आणि दुचाकीची धडक; तिघांचा जागीच मृत्यू!नांदेड: नांदेड - नागपूर महामार्गावर पिकअप व्हॅन आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात  दुचाकीवरील पती - पत्नीसह काकाचा जागीच मृत्यू झाला. हदगाव बरडशेवाळा बायपास जवळ आज सायंकाळी पाच वाजता हा अपघात झाला. संतोष टोपलेवाड, सुरेखा टोपलेवाड हे पती पत्नी आणि सतिष टोपलेवाड (काका) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. याबद्दल अधिक माहिती अशी कि,  संतोष टोपलेवाड हे पत्नीसह तिघेजण दुचाकीवर बामणी येथून हदगाव येथे सासूरवाडीला निघाले होते, मात्र नांदेड - नागपूर महामार्गावरील बरडशेवाळा बायपास जवळ पिकअप व्हॅन आणि दुचाकीचा समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या धडकेत तिघांचाही मृत्यू झाला.दरम्यान,  एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातल्याने टोपलेवाड कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured