Type Here to Get Search Results !

भाजपचा शिंदे गटाला दणका! शिंदे गटातील नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश!



मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. राज्यात शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. राज्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नवी मुंबईतील नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला.  तसेच, आता  नवी मुंबईतील शिंदे गटातील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.



नवी मुंबईतील तीन नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेतील या ३ नगरसेवकांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. दिघा येथील नगरसेवक नवीन गवते, दीपा गवते व अपर्णा गवते यांची भाजपमध्ये प्रवेश केली आहे. एक वर्षापूर्वी या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. या नगरसेवकांनी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे.



दरम्यान,  एकनाथ शिंदे गटातील ३ नगरसेवकांचा भाजप प्रवेशावरून गणेश नाईकांचे स्पष्टीकरण दिले आहे. या पक्ष प्रवेशात एकनाथ शिंदे गटाचा संबंध नाही. हे नगरसेवक शिवसेनेमध्ये होते आणि ते तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेमध्ये गेले होते. मनाने मात्र हे नगरसेवक भाजप मध्येच होते. एकनाथ शिंदे आणि माझ्यात एक कणाचे सुद्धा मतभेद नाहीत. जिल्ह्यात विकास करताना शिवसेना भाजप कार्यकर्ते समाजाच्या विकासासाठी एकत्र काम करतील हा आमचा विश्वास, अशी माहिती आमदार गणेश नाईक यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies