शिर्डी : आज (शनिवार) दुपारच्या सुमारास नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे नगर जिल्हा बँकेच्या येथे आज पाऊण वाजता अशोक सहकारी बॅंकेतील सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून अनावधानाने गोळी सुटल्याने एका शेतक-याचा मृत्यू झाला.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अशोक सहकारी बँकेतील सिक्युरिटी गार्ड दशरथ पुजारी हे कर्मचा-यांबरोबर नगर जिल्हा सहकारी बँकेच्या टाऊश शाखेत दैनंदिन कामकाजासाठी आले होते. त्यांच्या सोबत असलेले कर्मचारी हे पैसे भरण्यासाठी बँकेत गेले. पुजारी हे बंदूक खांद्याला लावत असताना बंदूकीतून अचानक गोळी सुटली. या दरम्यान बँकेच्या बाहेर श्रीरामपूर तालुका प्रगत बागायतदार संस्थेचे सभासद अजित विजय जोशी (रा. दत्त मंदिराजवळ, सार्वमत रोड, वार्ड नं. ७, श्रीरामपूर) हे दुचाकी नजीक उभे असताना सुटलेली गोळी त्यांच्या डोक्यात घुसली. त्यामुळे ते रक्तबंबाळ अवस्थेत जागेवरच कोसळले.रक्तबंबाळ झालेल्या अजित जाेशींचा जागेवरच मृत्यू झाला हाेता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संदीप मिटके, पीआय संजय सानप हे घटनास्थळी आले.पुढील घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.