Type Here to Get Search Results !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची ‘हि’ मोठी घोषणा!



नागपूर:  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात  मोठी घोषणा केली आहे. नागपुरातून लवकरच काही महत्वाच्या शहरापर्यंत 140 किलोमीटर ताशी वेगाने ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे, या प्रकल्पाला रेल्वे बोर्डाची देखील मंजुरी मिळाल्याचे गडकरी म्हणाले आहेत. 



नितीन गडकरी म्हणाले की, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती अकोला, नागपूर ते बैतुल नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते रामटेक या मार्गावर 140 किलोमीटर प्रति तासाने ब्रॉडगेज मेट्रो चालावी हे आमचे स्वप्न होते, असे गडकरी म्हणाले.



तसेच ते पुढे म्हणाले,  रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पुढच्या आठवड्यात दिल्लीला मेट्रो आणि रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे अशी माहिती ही त्यांनी दिली. तसेच लोकशाही ही 4 स्तंभावर उभी आहे. त्यामधील न्यायव्यवस्था अतिशय बळकट, दर्जेदार असणे लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. लोकशाहीतील प्रत्येक घटक दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी काल नागपुरात सांगितले.



दरम्यान, नितीन गडकरी  हे नागपूरमध्ये काही विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies