मुंबई: आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हा आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह कोणाकडे जाणार शिंदे गटाकडे की, ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. या सर्व चर्चांना उत्तर देण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, 'सध्या शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मात्र शिवसेनेपासून धणुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे मी माझ्या मना सांगत नसून कायदेतज्ञ, घटनात्मक अभ्यासकांशी बोलून तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज आपणाला नाही. कारण शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करुन शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.