आजचे राशीभविष्य, बुधवार २० जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष:-

मानसिक प्राबल्य वाढवावे लागेल. लिखाण करण्यास चांगला दिवस. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनाठायी घराबाहेर पडू नका. नवीन तांत्रिक बाबींची जाणीव करून घ्यावी.वृषभ:-

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. घरातील सर्वांशी मिळून-मिसळून वागावे. तुमची गरज भागवली जाईल. मनावर फार ताण घेऊ नका.मिथुन:-

प्रलोभनापासून दूर राहावे.  कामाचा फार बोभाटा करू नका. लपवाछपवीची कामे करू नका. घरगुती खर्च वाढू शकतो. हाताखालील लोक सहाय्यक ठरतील.कर्क:-

चैन करण्याकडे अधिक कल राहील. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मुलांशी हितगुज कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका.सिंह:-

व्यायामाला कंटाळा करू नका. नवीन उर्जेने कामे तडीस न्याल. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्यावी. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.कन्या:-

नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. वचन करण्यावर भर द्या. वरिष्ठांच्या कडून कौतुकास पात्र व्हाल. वादावादीच्या मुद्दयात सहभाग होऊ नका. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.तूळ:-

विसंवादाला थारा देऊ नका. प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील. मनात कोणतेही आधी बाळगू नका. जुनी येणी प्राप्त होतील.वृश्चिक:-

अंगीभूत कलेला वाव द्यावा. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. वडीलधार्‍यांचा मान राखावा. कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल. केलेली धावपळ सार्थकी लागेल.धनू:-

प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल.  उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. संयमाने कामे कराल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.मकर:-

गरज असल्यासच बाहेर पडा. जुनी देणी भागवली जातील. प्रेम सौख्यात वाढ होईल. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.कुंभ:-

औद्योगिक स्थिरता लाभेल. दिवस आनंददायी ठरेल. कोणावरही फार विसंबून राहू नका. घरात काही जुजबी बदल कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते.मीन:-

तुमच्या ज्ञानात भर पडेल. वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल. बोलण्यात गोडवा ठेवावा. निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल. बर्‍याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured