Type Here to Get Search Results !

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने केले ‘हे’ भयानक कृत्य!



बुलढाणा - मलकापुर तालुक्यालील वाघुळ येथिल ज्योती गजानन सनिसे वय २६ वर्ष हीने सासरकडील मंडळींनी दिलेल्या त्रासापाई रात्रीच्या सुमारास नायलाॕन प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  मृतक ज्योती हीचा विवाह १९ मे २०१७ रोजी वाघुळ येथिल गजानन दशरथ सनिसे याचेशी झाला होता. लग्नात वधुपित्या कडुन भेटवस्तू दागीने व ४० हजार हुंड्यापायी दीले. या नंतर या दोघांना २ मुली झाल्या पण कुटुंबीय क्रुर स्वभावाला हे पटले नसल्याने पतीसह सासरच्या इतर लोकांनी सततचे टोमणे मारत तुला मुलीच होतात तुला मुलगा होत नसल्याच्या अपमान जनक बोलणे तर पती गजानन सनिसे कडे नादुरुस्त क्रुझर गाडी असल्याने तिच्या दुरुस्तिसाठी माहेरवरुन ५० हजार आणण्याचा तगादा लावल्याने अशा प्रकारच्या सासरच्या  त्रासाने कंटाळून ज्योती हिने आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलले.



दरम्यान,  हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय मृतकाच्या नातेवाईकाने केला आहे . मृतकाचा भाऊ सागर वानखेडे यांनी मलकापुर शहर पोलीस स्टेशनमध्ये घातपात असल्याचे तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघास अटक केली असून  पाच जण फरार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies