Type Here to Get Search Results !

फडणवीसांच्या स्वागत बॅनरवरून ‘या’ ज्येष्ठ भाजप नेत्याचा फोटो गायब



नागपूर :  उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूर शहरात आले आहेत. यावेळी त्यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे नागपुरात जोरदार स्वागत केले. नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागताचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. 



देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देण्याला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोध केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शहरात बॅनर लावले आहेत. या बॅनरवर अमित शाह यांचा नसल्याचे दिसत आहे.



शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे फोटो आहेत. पण या फोटोत अमित शाह यांचा फोटो नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies