चिमुकल्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार!पुणे: पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी दाढी - मिशीवाल्या माणसाने, एका आठ वर्षाच्या चिमुकल्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,  पीडित मुलगा हा थेरगाव येथील बापूजी बुवा उद्यानाजवळ खेळत असताना त्या ठिकाणी एका अनोळखी दाढी - मिशी वाला इसम आला. आणि त्याने पीडित मुलाला मी तुला चॉकलेट घेऊन देतो असे सांगत एका दुकानात घेऊन गेला. त्या ठिकाणी चॉकलेट घेऊन दिल्यानंतर अनोळखी दाढी मिशीवाल्या इसमाने बापूजी बुवा उद्याना जवळील पवना नदीपात्रा लगत असलेल्या झाडीमध्ये नेऊन आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहेत.
दरम्यान,  या प्रकरणात पीडित मुलाच्या आईने वाकड पोलीस ठाण्यामध्ये एका अनोळखी दाढी - मिशी वाल्या इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी अनोळखी दाढी -मिशीवाल्या अज्ञात इसमा विरोधात भादवी 377, 367, 506 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured