Type Here to Get Search Results !

सोलापूर: जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!



सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. आज, शनिवारी सकाळी ६. २२ वाजता काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले. 



सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत आज, शनिवारी सकाळी ६.२२ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कर्नाटकातील विजापूरपासून १० किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळते. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवली गेली.



तसेच, मंगळवेढा तालुक्यातील काही गावांमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. येथील काही ग्रामस्थांनी ही माहिती दिली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. 



दरम्यान,स्थानिक प्रशासनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies