Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार १९ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

अचानक धनलाभ संभवतो.  मानसिक ताण तणावापासून दूर राहावे. स्वभावात काहीसा तिरकसपणा येऊ शकतो. निष्कारण येणारी उदासी टाळावी. पत्नीला कामात सहकार्य करावे.



वृषभ:-

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.  अभ्यासूपणे काम करावे लागेल. संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. कामाचा फार गवगवा करू नका.



मिथुन:-

हातातील कामात यश येईल.  मनातील भावना उत्कृष्टपणे मांडाव्यात. दिवसाची सुरुवात अनुकूल राहील.  ठरवलेली कामे समाधानकारक फळ देतील. घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. 



कर्क:-

धरसोड वृत्ती टाळावी लागेल. विवेकाने केलेली कामे फळाला येतील. योग्य नियोजनावर भर द्यावी. कामाचा फार ताण घेऊ नका. मनोरंजन, मौजमजा करण्यात अधिक वेळ घालवाल.



सिंह:-

व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल. हित शत्रू नरम होतील. घरात तुमचा वरचष्मा राहील. प्रिय व्यक्तीच्या शब्दात अडकाल. इतरांचा विश्वास संपादन कराल.



कन्या:-

मनातील प्रेमभावनेत वाढ होईल. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आवडत्या कामात गुंग व्हाल. कामे सुलभतेने पार पडतील.



तूळ:-

कौटुंबिक वातावरणात रमाल. कफाचे विकार संभवतात. परिश्रमानंतर इच्छित फळ मिळेल. देणी-घेणी मिटतील. नामस्मरण केल्याने चित्त शांत होईल.



वृश्चिक:-

तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. स्वत:च्या मनाप्रमाणे वागाल. कामातील अडचणी कमी होतील.   स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील.



धनू:-

इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. अंतर्गत विरोध होण्याची शक्यता. कामे विचारपूर्वक करावीत. नवीन बदल स्वीकारावे लागतील. मन काहीसे विचलित राहील.



मकर:-

योग्य संधीचा लाभ घ्यावा.  डोके शांत ठेवून कामात लक्ष घालावे. व्यापार्‍यांना काही चांगले लाभ होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.



कुंभ:-

जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका. आळस झटकून कामाला लागावे. अनाठायी खर्चाला आळा घालावा. चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी. बोलताना संयम राखावा.



मीन:-

चुकीच्या संगती पासून दूर राहावे. स्वत:वर ठाम विश्वास ठेवावा. अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा. स्वमतावर ठाम राहावे. जबाबदारी झटकून चालणार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies